Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या अलीकडच्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळाला. अर्जुन कोर्टात प्रिया विरोधात अनेक पुरावे सादर करतो. यामुळे तिची चांगलीच कोंडी होते. याशिवाय विलासचा खून होण्याआधीपासून साक्षी शिखरे आणि प्रिया एकमेकींच्या मैत्रिणी असल्याची जुनी क्लिप अर्जुन कोर्टात सर्वांना दाखवतो. हे सगळे पुरावे पाहून साक्षीला देखील चांगलाच घाम फुटतो.

अर्जुनच्या युक्तिवादापुढे दामिनी फेल ठरते. आता विलासच्या खूनाच्या तपासादरम्यान पुढे काय-काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे अर्जुन कोर्टाच्या कामात, केसचे पुरावे शोधण्यात व्यग्र असतो. तर, दुसरीकडे अश्विनशी लग्न करून सुभेदारांच्या घरात आलेली प्रिया रोज नवनवीन कारस्थानं रचून सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते.

आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत अश्विनचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सायली स्वत: पुढाकार घेऊन अश्विनच्या ( धाकटा दीर ) आवडीचे सगळे पदार्थ बनवते. मात्र, यादरम्यान प्रिया मोठा गेम खेळते. “आज तुझा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्यासाठी एवढं सगळं बनवलं आहे” असं प्रिया अश्विनला सांगते.

खरंतर, सगळं जेवण सायली आणि कल्पनाने बनवलेलं असतं. पण, आयत्यावेळी अश्विनसमोर सगळं क्रेडिट प्रिया घेते. यावर सायली काहीच बोलत नाही पण, यावेळी पूर्णा आजी प्रियाचा खोटेपणा सहन करून घेणार नाहीये. ती प्रियाला सर्वांसमोर चांगलंच खडसावणार आहे.

पूर्णा आजी थेट तिला म्हणते, “तन्वी ( प्रिया ) खोटं बोलू नकोस हे सगळं जेवण कल्पना आणि हिने केलंय” यावर अर्जुन मुद्दाम विचारतो, “हिने म्हणजे कोणी?” पूर्णा आजी यावर सांगते, “तुझ्या बायकोने”. सत्य परिस्थिती सर्वांसमोर उघड झाल्यावर प्रियाचा चेहरा पुन्हा एकदा पडतो. तर, एवढ्या दिवसांनी पूर्णा आजीने आपली बाजू घेतलीये या विचाराने सायली आनंदी होते.

सायली मनातल्या मनात म्हणते, “आज पूर्णा आजी एवढ्या दिवसांनी माझ्यासाठी, माझ्या बाजूने बोलल्या आहेत… आता लवकरच माझ्याशीही बोलतील.” मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या २३ मे रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८:३० वाजता प्रक्षेपित केली जाते.