‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाहवरील मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या कथेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेत एकिकडे सायली-अर्जुनमध्ये खूप चांगली मैत्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी प्रिया सतत प्रयत्न करताना दिसतेय. परंतु, लवकरच मालिकेच्या कथानकात प्रेक्षकांना एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : Birthday Special : ‘वैभव आणि बरंच काही’

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर अलीकडेच मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना मालिकेचा गणपती विसर्जन विशेष भाग पाहायला मिळणार आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायलीवर अज्ञात व्यक्ती जीवघेणा हल्ला करणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली…

गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायली हातात चाकू घेऊन आलेल्या माणसाला पाहते आणि जोरात अहो…अशी अर्जुनला हाक मारते. त्या अज्ञात व्यक्तीने सायलीच्या पोटावर वार केल्याने ती बेशुद्ध होऊन खाली पडते. सायलीवर पुढचा वार होण्याच्या आधी अर्जुन तेथे पोहोचतो आणि सायलीला सावरतो. पोटात वार झाल्याने सायलीला उठताही येत नसल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहालयला मिळत आहे. त्यामुळे अर्जुन आपल्या बायकोचा जीव वाचवणार की नाही? हे प्रेक्षकांना आगामी विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : पैशांसाठी नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे सोडली ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिका; शैलेश लोढांनी प्रथमच दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Story img Loader