मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जुई गडकरी. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत तिनं साकारलेली साधी, सरळ, सोज्वळ सायली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. जुईची ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. लवकरच मालिकेला वर्ष पूर्ण होणार आहे. अशातच जुईने ‘पुढचं पाऊल’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा – “मालिकेचं नाव बदला…”; गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहून प्रेक्षकांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “मुर्खपणाचा कळस…”

अभिनेत्री जुई गडकरी तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून भरभरून प्रेम व्यक्त करत असतात. नुकतीच तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

या इन्स्टाग्राम स्टोरीवर जुईने ‘पुढचं पाऊल’ या तिच्या गाजलेल्या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला आहे आणि लिहीलं आहे, “पहिला प्रोमो…सासुबाई प्रसाद…” ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचा पहिला प्रोमो ‘ओल्ड इज गोल्ड सीरियल’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत हर्षदा खानविलकरसह ‘या’ नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक; साकारतायत ‘ही’ भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ मालिकेत जुईने साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती. या मालिकेत जुई व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, आस्ताद काळे, सुयश टिळक, शर्मिला शिंद, संग्राम समेळ असे बरेच कलाकार मंडळी होती. तब्बल सहा वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.