‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ सध्या मराठी मालिकाविश्वावर अधिराज्य गाजवतं आहे. सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर टिकून आहे. लवकरच या मालिकेला टक्कर देण्यासाठी ‘आता होऊ दे धिंगाणा २’ प्रव्हेंजर्स येणार आहेत. यादरम्यान ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी म्हणजे अभिनेत्री केतकी पालव आणि समृद्धी केळकरमध्ये जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या आठवड्यात ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘ठरलं तर मग’ मालिका विरुद्ध प्रव्हेंजर्स यांच्यात सांगीतिक लढत होणार आहे. प्रव्हेंजर्समध्ये जुन्या मालिकेतील कलाकार पाहायला मिळणार आहे. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील सूर्या दादा, पश्या, ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा-कार्तिक, ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू, ‘स्वाभिमान’मधील पल्लवी, ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार म्हणजेच प्रव्हेंजर्स ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी टक्कर देणार आहेत. यादरम्यान साक्षी आणि समृद्धीची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ही जुगलबंदी पाहून ‘आता होऊ दे धिंगाणा २’ सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधवही हैराण झाला आहे. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: अखेर मयुरीचं सत्य राजवीर समोर उघड होणार, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत रंजक वळण येणार

या व्हिडीओमध्ये, साक्षी आणि समृद्धी ‘फक्त लढ म्हणा’ चित्रपटातील ‘डाव इश्काचा’ या गाण्यावर जबरदस्त नाचताना दिसत आहेत. हाच नाच पाहून सिद्धार्थ जाधवसह सगळे कलाकार त्यांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनने भाचा अगस्त्यची केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साक्षी आणि समृद्धीचा नाच पाहून “कडक” अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय ‘राडा’, ‘क्या बात है’, ‘जबरदस्त’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.