‘ठरलं तर मग’ या मालिकेची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीचं अव्वल स्थान राखून ठेवलं आहे. या मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सायली-अर्जुनच्या जोडीने प्रेक्षकांनी भुरळ तर घातली आहेच, पण खलनायिकेचं पात्र साकारणारी साक्षी म्हणजेच केतकी पालवदेखील नेहमी चर्चेत असते.

केतकी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सेटवरील धमाल मस्ती आणि रिल्स ती चाहत्यांबरोबर अनेकदा शेअर करत असते. आता नुकताच एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटातलं ‘सजनी रे’ हे गाण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. या गाण्यावर आता केतकीने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. केतकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… १४ वर्षे इंडस्ट्रीत पण ‘या’ अभिनेत्रीने कधीच नाही केलं कोणाला डेट; म्हणाली “आजच्या काळात हे…”

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अभिनेत्रीने फिकट सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. खुले केस, मिनिमल मेकअप, मॅचिंग ज्वेलरी यात केतकीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. केतकीचा व्हिडीओ व्हायरल होताच तिच्या चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “नजर लागणार अशी सुंदर मुलगी.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुझे डोळे खूप सुंदर आहेत.”

सध्या मालिकेत काय घडतंय

चैतन्यचा खरा चेहरा साक्षीसमोर येताच ती अर्जुन-सायली आणि चैतन्यविरोधात एक नवा प्लॅन रचते. पत्रकार परिषद बोलावून मीडियासमोर ती चैतन्य आणि अर्जुनने माझी फसवणूक केली असं सांगते. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो. आता अर्जुन-सायली आणि चैतन्य काय पाऊल उचलणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत.

हेही वाचा…  “मी माझा राग…”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला बाबा होण्याचा ‘तो’ अनुभव, म्हणाला…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली प्रमुख भूमिका साकारत आहेत; तर प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्या निर्णायक भूमिका यात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… वडिलांनी कायमचं मारून टाकण्याच्या आधीच आईने दिला पळून जाण्याचा सल्ला, ‘या’ अभिनेत्याने सांगितला आयुष्यातला तो कठीण प्रसंग