‘पिंजरा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमुळे अभिनेते अतुल तोडणकर घराघरांत लोकप्रिय झाले. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत त्यांनी साकारलेल्या विनायक काका या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मालिकेत सध्या सुरू असलेल्या सीक्वेन्समध्ये विनायक वैयक्तिक कामानिमित्त मुंबईत गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात अतुल तोडणकर नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. अमेरिकेत नाटकाचे प्रयोग करताना अतुल तोडणकर यांना कसा अनुभव आला याविषयी त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : खलनायिकेची भूमिका साकारल्यामुळे कधी प्रेक्षकांचा वाईट अनुभव आला का? रुपाली भोसले म्हणाली, “मला खूप….”

अतुल तोडणकर यांची पोस्ट

आज ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला…खूप संमिश्र आठवणी

SHOW MUST GO ON.

माझा हा अमेरिकाचा तिसरा दौरा…मोठेपणा मिरवत नाहीये म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आलाय…पण या वेळेस गंमत केली अमेरिकेने…हाऊसफुल्ल शो चालू होते. शिकागो, सेंट लुईस आणि डॅल्लासचा शो झाल्यावर मला शिंगल्सचा त्रास झाला…म्हणतात की कांजन्याचं वायरल इन्फेक्शन.. अर्धा चेहरा आणि डोळा सुजला होता…पण, अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत, त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा…

आज आमची दौऱ्याची सांगता झालीये आणि मी पूर्ववत होतो तसा झालोय…हीच तर नाटकाची गंमत आहे मित्रांनो या दोन्हीही वीकएंडला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती.. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे अजय वसुधा, निहार पटवर्धन, अतुल अरंके, राहुल कर्निक सर्वांना खूप खूप प्रेम.

हेही वाचा : Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून पोहोचली आलिया भट्ट, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
atul todankar
अतुल तोडणकर

अमेरिकेत नाटकाच्या दौऱ्यादरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या कुकीला आजारपणाचा सामना करावा लागला होता. या आजारातून हळुहळू ते सावरत आहेत. दरम्यान, अतुल तोडणकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत विनायक काका उर्फ ‘कुकी’ची भूमिका साकारत आहेत. तसेच यापूर्वी त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनयनाचा ठसा उमटवला आहे.