Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding: अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके काल, २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या तितीक्षा- सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला ‘बिग बॉस १७’मधील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या शर्मा व नील भट्टने हजेरी लावली होती. या लग्नासाठी ऐश्वर्या व नीलने खास लूक केला होता. अभिनेत्रीने शेवाळी रंगाची सुंदर नक्षीकाम असलेली साडी नेसली होती. तर नीलने अभिनेत्रीला मॅचिंग असा शेवाळी रंगाचा कुर्ता, डिझाइनजर जॅकेट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. पण तितीक्षा-सिद्धार्थचं ऐश्वर्या व नीलशी काय कनेक्शन आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

हेही वाचा – Video: मिस्टर अँड मिसेस बोडकेच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

तर सिद्धार्थने ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत ऐश्वर्या व नील प्रमुख भूमिकेत झळकले होते. त्यामुळेच सिद्धार्थच्या लग्नात ऐश्वर्या व नील यांनी खास हजेरी लावली होती. “एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले… लग्नाच्या मनापासून शुभेच्छा,” असं कॅप्शन लिहित ऐश्वर्याने तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – पंकज उधास यांची पत्नी फरीदाशी ‘अशी’ झाली होती पहिली भेट, जाणून घ्या काय करतात त्यांच्या मुली?

दरम्यान, तितीक्षा व सिद्धार्थने लग्नासाठी खास पेस्टल रंगाची निवड केली होती. अभिनेत्रीने ऑफ व्हाइट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. दोघं या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.