‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी निर्मात्यांवर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. अलीकडेच रिटा रिपोर्टर फेम प्रिया अहुजाने मालिकेचा राजीनामा दिला. तसेच मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. नुकत्याच ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार जेनिफरने सेटवरच्या समस्यांविषयी भाष्य केले आहे.

हेही वाचा : Video : “२३ दिवस, २ देश आणि ११ प्रयोग”, प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचं कुटुंब…”

जेनिफर मिस्त्री म्हणाली, “सेटवर आम्हाला सलग २० दिवस एकच पोशाख घालावा लागायचा. प्रोडक्शन टीम केव्हाच कपडे धुवायची नाही. दिवसभर शूट करून कपड्यांना वास यायचा. ते कपडे काहीजण स्वत: धुवायचे आणि ड्रायरने सुखवायचे. काही निवडक लोकांचे कपडे प्रोडक्शन टीम धुवायची अन्यथा आम्हाला कोणतीच सुविधा नव्हती. मी निर्मात्यांविरोधात पोलीस तक्रारही केली आहे परंतु, ते मला सातत्याने टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मला खूप अस्वस्थ वाटत आहे.”

हेही वाचा : चितेवर झोपलेली व्यक्ती झाली जागी; स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मारला कपाळाला हात

जेनिफर पुढे म्हणाली, “महिला कलाकारांना सेटवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. जेवण नसायचे, व्यवस्थित पोशाख नव्हता. आम्ही तासनतास मेकअपरुममध्ये थांबून राहायचो. कलाकारांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या गोष्टीसाठी भीक मागावी लागायची. सेटवर मोजक्याच पाण्याच्या बाटल्या उपलब्ध होत्या आणि त्यात कोणी जास्त पाणी मागितले तर ऐकून घ्यावे लागायचे. रात्री ९ च्या शिफ्टला एक बिस्किटचा पुडा मागितला तरी दिला जात नव्हता. जर बिस्किट खाल्ले, तर जेवण विसरावे लागायचे.”

हेही वाचा : “बापू, मारलं की निमूट मरायचं…” महात्मा गांधींना उद्देशून अतुल कुलकर्णी यांनी सादर केलेली कविता व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संपूर्ण शोमध्ये मी शूटसाठी माझे स्वतःचे दागिने घातले होते. चपलांसाठीचे पैसेही २ ते ३ वर्षांपासून देण्यास सुरुवात केली. त्याआधी फाटलेल्या चपला दिल्या जायच्या. लहान मुलांना आपल्या कपड्यांची सोय स्वत: करावी लागायची. सेटवरील मुलांना प्रॉडक्शनकडून कधीच कपडे दिले जात नव्हते. कोविड-१९ च्या काळात CINTAA ला पाठवल्या जाणाऱ्या व्हिडीओमध्ये फक्त सर्व नियम पाळले जायचे. प्रत्यक्षात मात्र एकदाच सेट सॅनिटाइज करण्यात आला होता. आम्हाला देण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये झुरळे होती, तर शोमध्ये पुरुष लीड्स असलेल्या कलाकारांना आलिशान गाड्या होत्या. आम्ही तक्रार करायचो पण, आमचे ऐकणार कोण? कोणाला काहीच फरक पडत नव्हता. तुम्हाला एसी रुम देऊन उपकार करत आहोत” असे सांगत जेनिफरने पुन्हा एकदा मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहे.