‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने ज्याचं नाव संपूर्ण जगाला कळलं ते नाव म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी या त्यांच्या पत्नी आहेत. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सामाजिक राजकीय मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाच्या यशावर भाष्य केलं आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बराच वाद निर्माण झाला होता. मात्र तरीदेखील चित्रपटाने बरीच कमाई केली आहे. यावर विवेक अग्निहोत्री कार्वाका पॉडकास्टमध्ये असं म्हणाले की “पठाण हा केवळ शाहरुखचा करिष्मा व त्याच्या चाहत्यांमुळे चालला. ज्या पद्धतीने त्याचे मार्केटिंग केले, त्याचप्रमाणे ‘हा माझा चित्रपट आहे आणि त्याला मी जबाबदार आहे’, हे ज्या प्रकारे त्याने आपल्या खांद्यावर घेतले ही चांगली गोष्ट आहे.”

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

तुझ्यात इतका रोमान्स कुठून आणलास? ओंकार भोजने म्हणाला, “मी शाहरुख खान…”

ते पुढे म्हणाले, “मला असंही वाटतं यांचं श्रेय चित्रपटाविरोधात मूर्खपणाची विधाने करणाऱ्या, विनाकारण निषेध करणाऱ्या व बहिष्कार घालणाऱ्या लोकांनाही द्यायला हवे. बॉयकॉट बॉलीवूड गँग’पेक्षा हे वेगळे लोक आहेत. एक प्रकार असाही आहे की जो अनेकवर्षांपासून सुरु आहे तो म्हणजे ‘बॉलिवुडवर बहिष्कार टाका’ असे म्हणणारे लोकं कित्येक वर्ष आहेत. हे लोक बाजारात नवीन होते त्यांना हे करण्याची गरज नव्हती. यात काही हिंसक घटक होते जे म्हणाले आम्ही हे जाळून टाकू आणि ते जाळून टाकू , मला असं वाटतं त्यांनीदेखील हातभार लावला आहे. आणि अर्थातच, आमच्या मीडिया चॅनेलने,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

देशांतर्गत या चित्रपटाने ४५२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरातही ‘पठाण’चाच डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ८७७ कोटी कमावले आहेत. पठाण चित्रपटातून शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण जॉन अब्राहम या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.