मराठी मालिका विश्वातील कलाकारांना आज दुःखद धक्का बसला. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवला कोल्हापूर सांगली महामार्गावर एका ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातामध्ये कल्याणीचा जागीच मृत्यु झाला. कल्याणीच्या निधनानंतर कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. अशामध्येच आता कल्याणीने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

कल्याणी सोशल मीडियावर अधिक सक्रिय होती. तिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केलं होत. कल्याणी प्रगतीच्या मार्गावर असताना ही दुःखद घटना घडली. तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक दिवसापूर्वी रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये ती “वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो व्यक्ती सोडून गेल्यावर.” तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कल्याणीच्या मृत्युनंतर तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भावूक होत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला डंपरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणी कुरळे ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. तिने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने ‘सन मराठी’ या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केलं होतं.