‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय झाली आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा विवाहसोहळा पार झाला. थाटामाटात विवाहसोहळा पार पडल्यावर मालिकेत लग्नानंतरच्या खेळांचा सीक्वेन्स घेण्यात आला. आता लवकरच नव्या संसाराची सुरूवात म्हणून अक्षरा-अधिपती जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घ्यायला जाणार आहेत.

हेही वाचा : “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

अक्षरा-अधिपती जेजुरीला जाणार असल्याचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मास्तरीण बाई निळी साडी नेसून आणि मराठमोळा साजशृंगार करून अधिपती रावांसह जेजुरी गडावर जाणार असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : Video : हास्यजत्रेच्या नायिका बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह थिरकल्या, ‘या’ व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

अधिपती-अक्षरा जेजुरीच्या पायऱ्या चढणार इतक्यात त्यांना नव्या संसाराची सुरूवात करताना बायकोला घेऊन गड चढावा लागतो असं सांगितलं जातं. यानुसार अधिपती अक्षराला घेऊन संपूर्ण गड चढणार असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : अंगात खाकी, हातात बंदूक अन्… ‘सिंघम अगेन’मधील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचील अक्षरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्चशिक्षित मुलगी असते. तर, दुसरीकडे अधिपती हा कमी शिकलेला पण, गर्भश्रीमंत असतो. अधिपतीच्या प्रेमामुळे त्याची आई म्हणजेच भुवनेश्वरी दोघांचं लग्न लावून देते. या मालिकेत शिवानी रांगोळ, ऋषिकेश शेलार, कविता लाड, स्वप्नील राजशेखर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.