‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला. सध्या मालिकेत अक्षराला भुवनेश्वरीच्या भूतकाळातील सत्य समजल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

अधिपतीशी लग्न झाल्यापासून अक्षरा तिचे सासरे चारुहासची वाचा परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. अखेर तिच्या प्रयत्नांना यश येऊन चारुहास बरा होतो. अक्षरा देवीसमोर प्रार्थना करत असताना तो सूनेला तथास्तू म्हणतो. सासऱ्यांना ठणठणीत बरं झालेलं पाहून अक्षरा फारचं आनंदी झाल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : अर्जुन करणार महिपतची बोलती बंद! कोर्टात सादर करणार मोठा पुरावा, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

पुढे, चारुहास सुनेला भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य सांगतो. सासऱ्यांनी केलेला खुलासा ऐकून अक्षराला धक्का बसतो. चारुहासच्या पत्नीचं व अधिपतीच्या खऱ्या आईचं नाव चारुलता असं असतं. भुवनेश्वरी केवळ पैशांसाठी सूर्यवंशींचं घर उद्धवस्थ करते. त्यामुळे या संकटांतून अधिपतीला फक्त अक्षराच लवकरात लवकरत बाहेर काढू शकते असा विश्वास चारुहासला असतो.

हेही वाचा : ‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्रीची कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत होणार एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका

एकीकडे, अक्षरासमोर भुवनेश्वरीचं सत्य उघड होतं. तर, दुसरीकडे आजारपणाचं खोटं नाटक करून भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या जाळ्यात ओढते. चारुहासकडून सत्य ऐकल्यावर अक्षरा नवऱ्यासमोर भुवनेश्वरीचं भांडं फोडण्याचा प्रयत्न करते. परंतु, याचा काहीच उपयोग होत नाही. अधिपती त्याच्या खोट्या आईच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षरा सगळ्या सुर्यवंशी कुटुंबासमोर भुवनेश्वरीला “तुमचं काम फक्त अधिपतीला सांभाळणं एवढंच होतं. पण, तुम्ही या घरात पाय रोवून सगळं बळकावलं” असं खडसावून सांगते. यावर भुवनेश्वरी अधिपतीला सांगते, “ही काल आलेली पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते. याला काय अर्थ आहे? आता ना तुम्हाला आमची गरज आहे… ना या घराला.” आईचं बोलणं ऐकून अधिपती संतापतो अन् रागात हात धरून अक्षराला घराच्या बाहेर काढतो. हा विशेष भाग प्रेक्षकांना १७ जानेवारी रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अधिपती खरंच अक्षराला घराबाहेर काढणार का? अधिपती-अक्षराच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यात भुवनेश्वरीला यश येईल का? हे मालिकेत लवकरच स्पष्ट होईल.