छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तुनिषाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न समोर येत आहेत. हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वयाच्या २० व्या वर्षी स्व:बळावर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत इतकं मोठं स्थान मिळवलेल्या या अभिनेत्रीने अचानक आत्महत्येचा पर्याय का निवडला? तिने आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड मोहम्मद शिझानची मेकअप रूम का निवडली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहेत. 
आणखी वाचा : “विश्वास ठेवणं…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचे ट्वीट चर्चेत

तुनिषाच्या आत्महत्येनंतर उपस्थित होणारे काही प्रश्न

१. तुनिषाने आत्महत्येच्या काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिचे केस नीट करताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ शूटींगदरम्यानचा आहे. आत्महत्येच्या काही तास पूर्वी तिने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला होता. मग अचानक असं काय झालं की तुनिषाने आत्महत्या केली?

२. तुनिषाच्या मृत्यूनंतर, पोलिसांच्या टीमने अलीबाबा मालिकेच्या सेटवर युनिट सदस्यांची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान तुनिषाने तिचा सहकलाकार शिझानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले. शिझान हा त्याचा सीन संपल्यानंतर जेव्हा मेकअप रुममध्ये पोहोचला तेव्हा त्याने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्याने मेकअप रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी तुनिशाला अशा अवस्थेत पाहून तो घाबरला. तुनिशाने शिझानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

३. तुनिषा फक्त २० वर्षांची होती. इतक्या लहान वयात ती फारच प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेत ती मरियमच्या मुख्य भूमिकेत दिसत होती. तिची सिनेसृष्टीतील आतापर्यंतच कारकिर्द पाहता ती तिच्या करिअरमध्ये फारच पुढे जात होती. तिच्यासाठी सध्याचा काळही चांगला होता. ती फारच प्रसिद्ध होती. पण मग अचानक तिने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले?

 ४. तुनिषा ही फार आनंदी असणारी मुलगी होती. ती नेहमी आनंदात दिसायची. आत्महत्येपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओही पोस्ट केला होता. मग तुनिषाने लगेचच मृत्यूला का कवटाळले? इतक्या लहान मुलीने मृत्यूचा मार्ग का निवडला?

५. शूटींगच्या सेटवर इतके लोक उपस्थित असतात. मग तिला आत्महत्या करताना कोणी कसे पाहिले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.   

आणखी वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास

दरम्यान तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पूर्व कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma suicide why choose sheezan makeup room what really happened on the shooting set 5 questions raised nrp
First published on: 25-12-2022 at 10:17 IST