Rashmi Desai Fitness Journey : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री व ‘बिग बॉस १३’फेम रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल नुकताच खुलासा केला आहे. रश्मी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी लढत आहे. घटस्फोटानंतर ती एकटी राहत असून, सध्या तिला आयुष्यातील विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

रश्मी देसाईने तिच्या फिटनेसबद्दल एक अपडेट शेअर करीत खुलासा केला की, ती आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असूनही तिने ९ किलो वजन कमी केले आहे. रश्मी देसाईने सांगितले, वजन कमी करण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. “हा प्रवास सोपा नव्हता. मला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पण, मला विश्वास आहे की, मी ते करू शकेन. कारण- माझा स्वतःवर विश्वास आहे,”

रश्मी झाली होती बॉडी शेमिंगची शिकार

याआधी आरती सिंगच्या संगीत समारंभातील फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. तिने एका मुलाखतीत म्हटले होते, “या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी समर्पण करावे लागते. मी नेहमीच २१ किंवा २२ वर्षांची दिसू शकत नाही. माझा प्रवास सुंदर राहिला आहे; परंतु काही लोकांना बदल स्वीकारणे कठीण जाते.”

रश्मी देसाईने २००४ ते २०१५ या काळात लोकप्रिय टीव्ही शो ‘उतरन’मध्ये काम केलं होतं. त्या शोमध्ये तपस्येच्या खलनायिकेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला खूच पसंती मिळाली होती. सुरुवातीला रश्मीने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं; पण ‘उत्तरन’ मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. रश्मी देसाई २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माँ तने नै समज’ या गुजराती चित्रपटात आणि २०२३ मध्ये ‘रात्री के यात्री २’ या वेब सीरिजमध्ये पाहण्यात आली होती.

रश्मी देसाई कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही रश्मी खूप सक्रिय आहे. रश्मी देसाई हिने टीव्ही मालिकांमध्येही मोठा काळ गाजवला आहे. अनेकदा ती मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्याबद्दल सांगताना दिसते. रश्मी देसाई हिने काही गुजराती चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसच्या घरातही रश्मी पोहोचली होती.