सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरील प्रसाधनगृहात गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास

“तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का, त्याचा आम्ही तपास करत आहोत,” अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली आहे. दरम्यान, तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. फ्री प्रेस जर्नलने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली. तुनिषा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती, इन्स्टाग्रामवर तिचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

तुनिषा सध्या सोनी सब टीव्ही मालिका अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय.

“…ते कधीच थांबत नाहीत”; तुनिषा शर्माने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेला सेटवरील व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने सलमान खान, कतरिना कैफ यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.