उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर अनेक नामवंत लोकांनीही तिच्यावर टीका केली. आता या सर्वामुळे उर्फीला मानसिक त्रास झाला असल्याचं तिने सांगितलं.

तिच्या या विचित्र स्टाईलमुळे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्या दोघींमधील वाद हा काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनला होता. पण उर्फीने माघार न घेता तिची अतरंगी स्टाईल तशीच ठेवली. ती परिधान करत असलेल्या कपड्यांमुळे तिच्याविरुद्ध तक्रारही नोंदवण्यात आली होती. या होणाऱ्या टीकेचा उर्फीला खूप त्रास झाला.

आणखी वाचा : “मी सेमी प्रेग्नंट…” वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य

‘डीएनए’च्या वृत्तानुसार तिने नुकतीच ‘मिस मालिनी’ला एक मुलाखत दिली. यात ती म्हणाली, “मी अजून मानसिकरित्या बरी नाहीये. मला माहित आहे की मला समुपदेशनाची किंवा मदतीची गरज आहे. आज मी सगळ्यांसमोर आहे म्हणून लोक मला ट्रोल करतात. बॉलिवूड अभिनेत्रीही ट्रोलिंगला घाबरतात. कारण मी जर उद्या कोणाला विचारलं की मला का ट्रोल करतोयस? तर तो म्हणेल की, मला तुझ्याबद्दल लिहायचं नाही. जा. काय करायचं ते कर.”

हेही वाचा : “मी त्यांना नकार दिला पण तरीही ते…” कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल उर्फी जावेदचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “कधी बातमी येते की पोलिसांनी मला अटक केली, कधी बातमी येते की कोणीतरी माझ्याविरुद्ध तक्रार केली. मध्यंतरी तर एक व्हिडीओ व्हायरल होत होता ज्यात लोक असं म्हणत होते की, जो उर्फीचा शिरच्छेद करून आणेल त्याला आमच्याकडून बक्षीस दिले जाईल. या सर्वाचा मला त्रास होतो.” आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.