प्रसिद्ध अभिनेत्री वाहबिज दोराबजी तिने दुसऱ्या लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. वाहबिजने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिचे पहिले लग्न व लग्नानंतरचे आयुष्य अनेक अडचणींनी भरलेले होते. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आता तिला स्वतःला आणि लग्नाला दुसरी संधी द्यायची आहे. तिने पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास व्यक्त केला आहे.

सहा वर्षांचा संसार मोडला, कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, “नात्याचा शेवट…”

वाहबिजने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच तिने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला मुलाखतीत दिली. यात ती म्हणाली, “जर आयुष्य अपेक्षेप्रमाणे नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रेम करण्याचा अधिकार नाही.” पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर वाहबिझचा अजूनही लग्न आणि प्रेमावर विश्वास आहे. ती लवकरच दुसरं लग्न करणार आहे. पण तिने त्याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडत असते, असं ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहबिझने यापूर्वी २०१३ मध्ये विवियन डिसेनाशी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर चार वर्षांत दोघेही वेगळे झाले. हा घटस्फोट तिच्यासाठी खूप वेदनादायी होता, असं तिने सांगितलं. घटस्फोटाच्या या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तिला बराच वेळ लागला. यासाठी तिला मित्र आणि कुटुंबीयांनी मदत केली. कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘प्यार की ये एक कहानी’ आणि ‘बहू हमारी रजनी कांत’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.