टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोपैकी एक म्हणजे एमटीव्हीवरील ‘रोडीज’. तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेला ‘रोडीज’ हा रिअ‍ॅलिटी शो गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यंदा ‘रोडीज’ १९वं पर्व पार पडलं. ‘रोडीज कर्म या कांड’ असं १९व्या पर्वाचं टायटल होतं. हेच टायटल रिया चक्रवर्तीच्या गँगमधील वासु जैनने जिंकलं असून सालाबाद प्रमाणे प्रिन्स नरुलाच्या पदरी अपयश आलं आहे. सात मिनिटांच्या फरकांनी प्रिन्सच्या गँगमधील सिवेट तोमरची विजेत पद जिंकण्याची संधी हुकली आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

‘रोडीज कर्म या कांड’ हे यंदाच पर्व चांगलंच गाजलं. हे पर्व इतर पर्वांपेक्षा वेगळं ठरलं. सोनू अस्त्र, रोडियमस अशा बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. तसेच या पर्वात रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे नवे गँग लीडर पाहायला मिळाले. यांच्याबरोबर सालाबाद प्रमाणे प्रिन्स नरुला देखील गँग लीडर म्हणून झळकला. तसेच सोनू सूदने हा शो आपल्या जबरदस्त अंदाजात होस्ट केला. सुरुवातीपासून रिया, गौतम आणि प्रिन्स या तीन गँग लीडरमध्ये चांगलीच जुंपली होती. प्रिन्स आणि गौतमचे तर टोकाचे वाद पाहायला मिळाले. पण शोच्या शेवटी दोघांमधील वाद संपुष्टात आले. मात्र या दोघांच्या भांडणात रिया चांगलीच बाजी मारून गेली. तिच्या गँगमधील वाशु जैन याने यंदाचं पर्व जिंकलं.

हेही वाचा – “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

वाशु हा सुरुवातीला प्रिन्स नरुलाच्या गँगमध्ये होता. पण प्रिन्सच्या गँगमध्ये असताना तो प्रत्येक टास्कमध्ये हरताना दिसला. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तो टास्क हरायचा. एकेदिवशी त्याला इतर रोडीजने वोट आउट करून एलिमिनेट ही केलं होतं. पण तो घरी जाता जाता वाचला. प्रिन्स गँगमधील प्रियांकाने स्वतःला दोन आठवड्यासाठी एलिमिनेट करून वाशुला घरी जाण्यापासून वाचवलं होतं. पण एका टास्कमध्ये वाशु रियाच्या गँगमध्ये गेला. त्यानंतर तो प्रत्येक टास्क जिंकू लागला आणि अखेरच्या फिनालेच्या टास्कमध्ये देखील त्यानेच बाजी मारली. अवघ्या १ मिनिट २२ सेकंदात त्याने रोडीज फिनालेचा टास्क पूर्ण केला.

हेही वाचा – “भक्तांचा अपमान…”, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका अचानक बंद; प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, म्हणाले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिंकविला’ या वृत्तसंस्थेशी बोलताना वाशू म्हणाला की, “मला शो नेहमीच जिंकण्याची इच्छा होती. सुरुवातीपासून माझ्या मनात हा शो जिंकणं हेच ध्येय होतं. अखेर मी ‘रोडीज’ची ट्रॉफी जिंकली. आता मी खूप आनंदी आहे.”