Vedanti Bhosale In Laughter Chefs Season 2: ‘कलर्स टीव्ही’चा ‘लाफ्टर शेफ्स २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढत आहे. जून २०२४मध्ये ‘लाफ्टर शेफ्स’चा पहिला सीझन आला होता, जो सुपरहिट झाला. त्यामुळे ‘लाफ्टर शेफ्स’ दुसरा सीझन काही महिन्यांनंतरच सुरू करण्यात आला. हा सीझनही प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला आहे. त्यामुळे १ एप्रिलला संपणारा ‘लाफ्टर शेफ्स २’ पुढे वाढवण्यात आला. याच लोकप्रिय शोमध्ये आता मराठमोळी साताऱ्याची वेदांती भोसले झळकणार आहे. याचा खुलासा अंकिता लोखंडेच्या पोस्टमधून झाला आहे.

हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असते. त्यामुळे ती कायम चर्चेत असते. नुकतेच अंकिताने ‘लाफ्टर शेफ्स २’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अंकिता, विकी जैनसह चिमुकली वेदांती पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ लवकरच वेदांती ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये पाहायला मिळणार आहे.

अंकिता लोखंडेनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये वेदांतीनं तिच्यासारखा हुबेहूब लूक केल्याचं दिसत आहे. अंकिताने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. तशाचं ड्रेसमध्ये वेदांती पाहायला मिळत आहे. म्हणजे ‘लाफ्टर शेफ्स २’च्या आगामी भागात छोट्या अंकिताच्या भूमिकेत वेदांती झळकणार आहे. अंकिताच्या या पोस्टवरील अमृता खानविलकरच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अमृता खानविलकरची प्रतिक्रिया
अमृता खानविलकरची प्रतिक्रिया

अमृता खानविलकर अंकिताबरोबर वेदांतीला पाहून लगेच प्रतिक्रिया दिली. अमृता म्हणाली, “अगं बाई आमची वेदांती…कंदी पेढा गं तो.” यावर वेदांतीनं प्रत्युत्तर देत अमृताचे आभार मानले आहेत. दरम्यान, वेदांती भोसले ‘झी मराठी’चा ‘ड्रामा ज्युनिअर’ कार्यक्रमात झळकली होती. यावेळी तिनं आपल्या दमदार अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली होती. या कार्यक्रमाचं परीक्षण अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडेनं केलं होतं. यावेळी अमृता व वेदांतीची शा‍ब्दिक जुगलबंदी खूप छान रंगायची. दोघींची बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.