वीणा जगताप लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वीणाने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. या पर्वामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. वीणाने काही महिन्यांपूर्वी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला होता. त्यानंतर ती ‘योग योगेश्वर जय शंकर’ या कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत झळकली. नुकतीच वीणाने ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावली. यामध्ये तिने एक किस्सा सांगितला आहे.

आमिरने जाहीर केली मुलीच्या लग्नाची तारीख, मराठमोळ्या जावयाचं कौतुक करत म्हणाला, “फिल्मी डायलॉग वाटू शकतो पण नुपूर…”

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यानंतर जवळ पैसे नसल्याने वीणा खोटं बोलली होती. तिनेच याबाबत खुलासा केला आहे. “मी टू व्हिलर घेऊन कॉलेजला जायचे आणि परत येताना एक चौक लागतो. एकेदिवशी तिकडे ट्रॅफिक पोलीस होते. माझ्याकडे लायसन्स होतं, पण गाडीचे पेपर नव्हते. त्यांनी मला आवाज देऊन बाजूला थांबवलं. त्यांनी ५० की १०० रुपयांचे चलान कापले. माझ्याकडे ५ रुपयेही नाहीयेत आणि यांना पैसे कुठून देऊ असा मी विचार करत होते,” असं वीणा म्हणाली.

“मग मी त्यांना म्हटलं, काका तुम्हाला माहितीये का माझा वडील पोलीस आहेत. मला ते कसं सुचलं माहीत नाही, पण मी धडधडीत खोटं बोलले. त्यांनी नाव विचारलं मग मी महेंद्र जगताप असं नाव सांगितलं. मग त्यांनी ते कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत, असं विचारलं. मी त्यांना ठाणे सांगितलं. कारण इथलं सांगितलं असतं तर त्यांनी उल्हासनगरला जाऊन चेक केलं असतं. मग त्यांनी पूर्ण नाव विचारलं. मी त्यांना महेंद्र रामचंद्र जगताप असं म्हणाले. मग ते पोलीस दुसऱ्याला म्हणाले, ‘अरे आपल्याकडे ते महेंद्र होते ना’. असं म्हणत त्यांनी मला जायला सांगितलं,” असं वीणा म्हणाली. हा किस्सा सांगताना वीणाला हसू आवरत नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by ?J.Viena? (@veenie.j)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मध्ये वीणा जगताप व शिव ठाकरे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्या प्रेम कहाणीची जोरदार चर्चा झाली होती. पण घराबाहेर आल्यानंतर कालांतराने ब्रेकअप झाले. सध्या दोघेही आपापल्या कामात व्यग्र आहेत.