अभिनेत्री वीणा जगताप(Veena Jagtap) ही सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत अभिनय करताना दिसत आहे. याआधी बिग बॉसमुळे ती चर्चेत आली होती. वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. आता एका मुलाखतीदरम्यान तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत वक्तव्य केले आहे.

“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना

अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब विथ सुरेखा तळवलकर’ या यूट्यूब चॅनेलला तिने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बिग बॉस संपल्यावर जेव्हा तू बाहेर आलीस तेव्हा तू कौतुक आणि टीका दोन्ही अनुभवलं असशील, तर तू त्याचा कसा सामना केला? यावर बोलताना वीणा जगतापने म्हटले, “प्रामाणिकपणे सांगायचं तर जेव्हा पहिली मालिका केली, तेव्हा लोकप्रियता थोडी कमी होती. बिग बॉसनंतर लोकप्रियता काय असते हे कळलं, पण त्याबरोबरच ट्रोलिंगदेखील आलं. लोकप्रियतेसाठी, ट्रोलिंगसाठी मी तयारच नव्हते. बाहेर आल्यानंतर लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं, पण जेव्हा ट्रोलिंग व्हायला लागलं तेव्हा तेसुद्धा मी खेळाडू वृत्तीने घेतलं.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…

“कधी कधी लोक एक लाइन असते ती क्रॉस करतात. मम्मीला, बहिणीला शिव्या लिहिल्या. एका फॅन पेजने मला मेसेज केला की, तू मरत का नाहीस? माझ्या आईलासुद्धा मेसेज यायचे की तुमची मुलगी मरत का नाही? मला असं वाटतं की, अशा प्रकारे कोणाला बोलू नये. कारण तुम्हाला माहीत नाही की घरची काय परिस्थिती आहे किंवा बहुतेक तीच व्यक्ती आहे जी कमावती आहे. माझे वडील २००९ मध्ये गेले. त्यानंतर माझ्या आईने खूप संघर्ष केला. आमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आम्ही कमवायला लागलो. जेव्हा मी या फिल्डमध्ये संघर्ष करायला लागले तेव्हा माझी आई मला म्हणायची की, जॉब कर ना; एक विशिष्ट रक्कम तुझ्या हातात राहील. तिला काही नको असतं. तिची हौसदेखील संपली आहे, इतका संघर्ष तिने पाहिला आहे. त्यानंतर जर तुम्ही तिला म्हणत असाल की तुमची मुलगी मरत का नाही? पण ते सगळं मी खेळाडू वृत्तीने घेतले. पण, काही गोष्टी मनाला लागतात. कारण माझ्या आई-वडिलांवर बोललं गेलं. माझ्या बहिणीचं सोशल मीडिया अकाउंट पब्लिक होतं, मग तिने ते प्रायव्हेट केलं. माझी एकच विनंती आहे की, प्लीज कोणाला ट्रोल करू नका. तुमच्या घरीही महिला आहेत, याचं जरा भान ठेवा; असे काही मेसेज आहेत जे मी कॅमेरा बंद झाल्यावर सांगेन.”

हेही वाचा: अमिताभ बच्चन, शाहरुख- सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

आता तू त्यातून बाहेर आली आहेस का? या प्रश्नावर उत्तर देताना वीणा जगतापने होकार देत म्हटले, “आता पूर्णत: त्यातून बाहेर आली आहे. बिग बॉस हा शोच असा आहे, ज्यामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यावेळी लोकांनी मला खूप ट्रोल केलं किंवा समज दिली असं म्हणूयात. पण, जेव्हा चांगलं झालं तेव्हा लोकांनी मला स्वीकारलं, कौतुक केलं. मला मेसेजदेखील यायचे की वीणा मला हे नव्हतं आवडलं; तेव्हा मी तुला अनफॉलो केलं होतं, पण मी आता तुला फॉलो करत आहे कारण आता तू आवडत आहे आणि तुला तुझी चूक समजली आहे. माझी ही सवय आहे की, मी सॉरी म्हणण्याने छोटी होईल असे मला वाटत नाही, त्यामुळे मी सॉरी म्हणते. परत हेच म्हणेन की, प्लीज कोणाला ट्रोल करू नका आणि मुलींबाबत घाण घाण लिहू नका, कारण ते खरंच मनाला खूप लागतं.”

दरम्यान, वीणा जगताप सध्या ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

Story img Loader