बिग बॉस हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. मागच्या बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचं सुत्रसंचलन करत आहे. या शोमध्ये दरवर्षी नवीन चेहरे सहभागी होतात. यापैकी काही चर्चेत राहतात तर काही कालांतराने गायबही होतात. यंदाचा १६ वा सीझनही सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. पण आता प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १५ चा सदस्य विशाल कोटियन याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा शो पुन्हा चर्चेत आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये सदस्य टीना दत्ताबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे आता विशाल कोटियनला ट्रोल केलं जातंय.

मागच्या आठवड्यात टीना दत्ताने शालीन भानोतशी बोलताना स्वतः एक ब्रँड असल्याचं म्हटलं होतं. टीना म्हणाली होती, “मी एक ब्रँड आहे. तुला वाटतं की मी सौंदर्या शर्माच्या आधी घरातून बाहेर पडेन? सोशल मीडियावर तिचे ६ मिलियन फॉलोअर्स आहेत पण तिच्या पोस्ट फार कमी लोकांच्या कमेंट्स आहेत.”

आणखी वाचा-“मी २१ वर्षांचा आणि ती १६…”, तब्बूबरोबर नात्याची चर्चा रंगत असताना नागार्जुनने केलेले जाहीर वक्तव्य

टीना दत्ताच्या याच वक्तव्यावर विशाल कोटियानने कमेंट केली आहे. त्याने ट्विटरवर टीना दत्ताबाबत एक ट्वीट केलं आहे. पण या ट्वीटमुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. विशालचं हे ट्वीट पाहून सोशल मीडिया युजर्स भडकले आहेत. विशाल कोटियनचं हे ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे. टीनाला ट्रोल करण्याच्या नादात विशाल स्वतःच ट्रोल झाला आहे. अनेकांना या ट्वीटवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
vishal kotiyan taunts tina datta

विशाल कोटियानने टीना दत्ताबाबत ट्वीट करताना लिहिलं, “टीना दत्ताला असं म्हणताना ऐकलंय की ती एक ब्रँड आहे. मला आश्चर्य वाटतंय की ती रुपा अंडरवियर आणि बनियानची ब्रँड आहे का? ती शोमध्ये आली आहे आणि एखादी स्टार असल्यासारखी वागतेय. हा रिअलिटी शो आहे खरं वागलात तरच लोक तुम्हाला पसंत करतात. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दु रोजिक हे तिघेच बिग बॉसचे खरे खेळाडू आहेत.” दरम्यान या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम आणि सुंबुल तौकीर यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.