Lataa Saberwal Share Post After Separation From Husband : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये हिना खानच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सभरवालने २००९ मध्ये तिचा सहकलाकार अभिनेता संजीव सेठ याच्याशी लग्न केले आणि यावर्षी २०२५ मध्ये तिने पतीपासून वेगळे झाल्याची घोषणा केली. अभिनेत्रीने तिचे १५ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आणि आता तिने करवा चौथच्या खास प्रसंगी एक पोस्ट शेअर केली आहे.
खरं तर, तिने ही पोस्ट त्या सर्व महिलांना समर्पित केली आहे ज्यांना कोणत्याही कारणास्तव करवा चौथ साजरा करता येत नाही आणि त्यांना सिंदूर, बांगड्या आणि मेहंदीची कमतरता जाणवते. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की सकारात्मक राहा, आशावादी राहा आणि पुढे जात राहा.
लता सभरवालची पोस्ट
लता सभरवालने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, “ज्यांना करवा चौथ साजरा करता आला नाही त्यांच्यासाठी… जेव्हा प्रत्येकजण त्यांचे ‘करवा चौथचे फोटो’ शेअर करतो आणि जो काही कारणास्तव हा सण साजरा करू शकत नाहीत, त्यांनी सिंदूर, बांगड्या, मेहंदी आणि चमकदार कपड्यांची कमतरता जाणवून मागे हटू नका.
तिने पुढे लिहिले, “त्या भावना मान्य करा आणि त्यांचा सामना करा. आपण आपल्या भावनांपासून जितके जास्त पळतो तितके त्या आपल्याला त्रास देतात. आणि दुःखी होणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल शोक करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतु… कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका, कारण असे बरेच सण आहेत जे तुम्ही साजरे करू शकता. सकारात्मक रहा, आशावादी रहा आणि पुढे जात रहा.”
त्यांच्या विभक्त होण्याच्या पोस्टमध्ये लताने लिहिले होते, “बराच काळ शांत राहिल्यानंतर आता मी जाहीर करतेय की मी (लता सभरवाल) माझ्या पतीपासून (संजीव सेठ) विभक्त झाले आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि याबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.”
ही अभिनेत्री ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये तसेच ‘ये रिश्ते है प्यार के, ‘शका लका बूम बूम’ व ‘वो रहने वाली महलों की’मध्येही दिसली होती. तिने ‘विवाह’ आणि ‘इश्क विश्क’सारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.