मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हे नाव कायमच वरच्या स्थानी असतं. सई ताम्हणकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरच्या रिलेशनशिपबद्दल कायमच चर्चा रंगताना दिसतात. नुकतंच सईने एका प्रसिद्ध कलाकाराला प्रेमाची कबुली दिली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

येत्या रविवारी २६ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळा रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची थीम ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ अशी आहे. नुकतंच सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ ‘झी मराठी’ने शेअर केला आहे.
आणखी वाचा : …म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

या व्हिडीओत निलेश साबळे हा सई ताम्हणकरबद्दलची बातमी सांगताना दिसत आहे. सईबद्दल एक खूप मोठी बातमी आपल्या हाती लागली आहे. सई ताम्हणकरचं या अभिनेत्याबरोबर सुरु आहे रिलेशन अशी बातमी ते स्क्रीनवर दाखवतात. त्या ठिकाणी सई ताम्हणकरचा फोटो असतो. त्या शेजारी एका अभिनेत्याला ब्लर केलेला फोटोही पाहायला मिळत आहे.

त्यानंतर स्क्रीनवर त्या अभिनेत्याचा चेहरा दाखवला जातो. तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून भाऊ कदम यांचा आहे. यावेळी निलेश साबळे हा आणखी काही फोटोही स्क्रीनवर दाखवतो. “चला हवा येऊ द्याच्या सेटवर झाली होती दोघांची मैत्री, भाऊने दिली आहे प्रेमाची कबुली” असेही निलेश साबळे तिला गंमतीत म्हणतो. त्यावर सई ताम्हणकर ही जोरजोरात हसताना दिसते. तसेच ती लाजतानाही दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ मजेशीर स्वरुपातील आहे.

आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सई नुकतीच ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती. त्याबरोबर ती ‘मीडियम स्पायसी’ या चित्रपटात ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसोबत दिसली होती. सध्या ती नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील नव्या सिरीजमध्ये दिसतेय ज्यात ती महाराष्ट्रातील निरनिराळ्या राज्यांना भेट देताना दिसत आहे.