Zee Marathi Awards Winner Part 1 : दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्याचा पहिला भाग आज ( ११ ऑक्टोबर ) प्रसारित करण्यात आला आहे. या भागात विविध कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स, किरण गायकवाड आणि प्रसाद जवादे यांच्या कुटुंबीयांबरोबरचे भावनिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

याशिवाय ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने यामधील कलाकारांचा यावेळी खास मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तर, लक्ष्मी निवास फेम जयंतला Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा पुरुष हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यासह सर्वोत्कृष्ट मैत्री हा पुरस्कार यंदा लक्ष्मी आणि सिद्धू या सासू अन् जावयाच्या जोडीला प्रदान करण्यात आला आहे. हा अवॉर्ड जाहीर होताच उपस्थितांनी एकाच जल्लोष केला होता.

‘झी मराठी’ पुरस्कार विजेते भाग – १

  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – सावळ्याची जणू सावली – जगन्नाथ
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – लक्ष्मी निवास – विश्वा
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – लक्ष्मी निवास – रेणुका
  • फ्रेश फेस ऑफ द इयर – कमळी
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री – सावळ्याची जणू सावली – जयंती
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष – देवमाणूस – जित्या
  • विशेष लक्षवेधी चेहरा – मीरा – तुला जपणार आहे
  • रायझिंग स्टार ऑफ द इयर – लक्ष्मी निवास – जान्हवी
  • सर्वोत्कष्ट भावंडं – लक्ष्मी निवास – वेंकी, भावना, जान्हवी
  • सर्वोत्कृष्ट खलनायिका – कमळी – कामिनी
  • सर्वोत्कृष्ट खलनायक – देवमाणूस – गोपाळ
  • सर्वोत्कृष्ट मुलगी – पारू
  • सर्वोत्कृष्ट मुलगा – पारू – आदित्य
  • सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
  • सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – संकर्षण कऱ्हाडे ( आम्ही सारे खवय्ये ) अभिजीत खांडकेकर ( चला हवा येऊ द्या )
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – अप्पू, गणी, आनंदी, हृतिक, हौसा, वेदा आणि वरद
  • सर्वोत्कृष्ट आजी – कमळी
  • सर्वोत्कृष्ट मैत्री – लक्ष्मी आणि सिद्धू ( लक्ष्मी निवास )

Zee 5 चे महत्त्वाचे पुरस्कार

  • Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा पुरुष – जयंत ( लक्ष्मी निवास )
  • Zee 5 फेव्हरेट व्यक्तिरेखा स्त्री – भावना ( लक्ष्मी निवास )
  • Zee 5 वर सर्वाधिक पाहिलेली मालिका – सावळ्याची जणू सावली
  • Zee 5 मोस्ट प्रॉमिसिंग शो – कमळी
  • Zee 5 लोकप्रिय जोडी – सारंग-सावली ( सावळ्याची जणू सावली )

दरम्यान, सर्वोत्कृष्ट मालिका, जोडी, नायक-नायिका हे महत्त्वाचे पुरस्कार कोणी जिंकले आहेत याचा उलगडा पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच १२ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.