‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अल्पवधीच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस आणखीन रोमांचकारी होताना दिसत आहे. अशातच ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहचली आहे.

हेही वाचा- Video नवऱ्याच्या वाढदिवशी अमृता देशमुखने केली पोलखोल; प्रसादचा स्वभाव बघून म्हणाली “अहो…”

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. अद्वैतच नेत्रावर हल्ला करताना दिसत आहे. दरम्यान अद्वैतचे डोळे लाल झालेले दिसत आहेत. तो इंद्राणी व नेत्राकडे रागाने बघत असतो. आणि अचानक तो नेत्राचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रोमोमुळे अद्वैत नेत्राचा जीव घेणार का? हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

प्रमोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. येत्या भागात अद्वैत नेत्राचा खऱचं जीव घेणार की हे वाईट स्वप्न आहे हे लवकरच कळेल, पण अद्वैतच्या अशा वागण्यामुळे नेत्रावर आणि घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होतो हेसुद्धा बघणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा- “तुम्ही भारतीय रेल्वेत ४० वर्ष…”, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचे वडील झाले सेवानिवृत्त! अभिनेत्री म्हणते, “आता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत आत्तापर्यंत तीन पेट्यांचा उलगडा झाला आहे. मात्र, या पेटीतील मजकुरावर सर्पलिपी लिहण्यात आली आहे. ही सर्पलिपी वाचण्यासाठी नेत्रा आणि अद्वैतला कोण मदत करणार? तसेच या पेटीतून उघडलेल्या रहस्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या नात्यावर नेमका काय परिणाम होणार याची प्रेक्षकांना उत्सुक्ता लागली आहे.