झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. या मालिकेतील नेत्रा-अद्वेतच्या जोडीचीही चाहत्यांना भुरळ पडलीय. या मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. कथानकामुळे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. विरोचक आणि देवी आईच्या लेकींच युद्ध असा सीक्वेन्स सध्या मालिकेत सुरू आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा तावडे प्रमुख भूमिकेत आहे. तर ऐश्वर्या नारकर खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत. पंचपेटीकेचं रहस्य, विरोचकाचं रूप, नेत्राची शक्ती अशा अनेक गोष्टींमुळे या मालिकेला वेगळं वळण आलं आणि ही मालिका रहस्यमय झाली.

हेही वाचा… सलमान खान, रणवीर सिंग अन्…, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी इटलीला निघाले सेलिब्रिटी; व्हिडीओ व्हायरल

१२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या या मालिकेला लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील. आता मराठी प्रेक्षकांसह इतर भाषेतील प्रेक्षकही ही मालिका पाहू शकणार आहेत. कारण या मालिकेचं आता हिंदीमध्ये डबिंग होणार आहे. ‘अ‍ॅंड टिव्ही’ या वाहिनीवर ही मालिका ‘सातवें लडकी की सातवी बेटी’ या नावाने प्रसारित होणार आहे. आजपासून (२७मे) ही मालिका सगळ्यांना पाहता येणार आहे.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता या मालिकेचं प्रसारण ‘अ‍ॅंड टिव्ही’ या वाहिनीवर होणार आहे. झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका हिंदीतही तेवढीच हिट ठरेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका कथानकामुळे चर्चेत आली. आता या कथेच रुपांतर हिंदी भाषेत झाल्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

हेही वाचा… अखेर रॅपर बादशाहने हनी सिंगबरोबरचं भांडण तब्बल १५ वर्षांनी मिटवलं; म्हणाला, “काही गैरसमजामुळे…”

दरम्यान, जयंत पवार दिग्दर्शित ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट येणार आहे. विरोचकाची संमोहित करण्याची शक्ती आता काम करत नसल्याने पुढे नेत्रा काय पाऊल उचलणार यावर सगळ्यांच लक्ष आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका त्यांचं स्थान टिकवून आहे.