‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली . या शोमधील प्रत्येक कलाकाराचं समीक्षक आणि चाहत्यांकडून कौतुक होताना दिसतंय. या शोमधील श्रीकांत तिवारीची मुलगी धृति म्हणजचे अभिनेत्री अश्लेषा ठाकुरच्या भूमिकेचं देखील कौतुक करण्यात आलं. अश्लेषा या शोच्या दोन्ही सिझनमध्ये झळकली आहे. मात्र खास करून दुसऱ्या सिझनमध्ये धृति आणि कल्याणच्या लव्ह स्टोरीमुळे तिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या भूमिकेनंतर अश्लेषाला लोकप्रियता मिळाली असून सोशल मीडियावर आता तिला लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्लेषाने तिच्या भूमिकेसोबतच अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. अश्लेषा म्हणाली अनेक जण तिला डायरेक्ट मेसेज करून लग्नासाठी विचारत आहेत. तसचं काहीजण विचित्र मेसेज करत आहेत तर काही चांगले मेसेज करत आहेत. अश्लेषा तिला येणारे मेसेजेस एन्ज़ॉय करत असल्याचं या मुलाखतीत म्हणाली.

हे देखील वाचा: ‘हे’ आहे सैफ अली खान आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव; चिमुकल्याला सैफ लाडाने म्हणतो…

‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या सिझनमध्ये अश्लेषाचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला. तर दुसऱ्या सिझनमधील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

हे देखील वाचा: Video: “ब्लाउजच घातलं नाही तर मास्क कुठून आणणार”; ‘त्या’ ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये अश्लेषाला कल्याणला किस करण्याचा सीन करायचा होता. या सीनवेळी ती खूपच नर्वस असल्याचं अश्लेषा म्हणाली. ती म्हणाली, “माझ्यासाठी हे नवीन होतं. मला माझ्या भूमिकेत मॅच्युरिटी आणायची होती. हे खूप सहज केल्यासारखं दिसावं असं मला अपेक्षित होतं. मी खूप रोमॅण्टिक वेब सीरिज पाहिल्या. किसिंग सीन शूट करणं थोडं टेक्निकल होतं. त्यात काही फन नव्हत. हे माझं काम आहे आणि मला ते उत्तम करायचं होतं. माझा माझ्या दिग्दर्शकावर विश्वास होता.” असं अश्लेषा म्हणाली.

‘शक्की’ या मालिकेतून अश्लेषाने २०१७ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. त्यानंतर तिने ‘जीना इसीका नाम है’ या सिनेमातही काम केलंय.