बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. अभिनेता अनिल कपूर यांचं आता वय जास्त झालं असलं तरी त्यांच्या फिटनेसपुढे अनेक तरूण आणि हॅंडसम अभिनेते देखील फिके पडतात. मुलगी सोनम कपूरच्या लग्नातही अनिल कपूर यांच्या फिटनेसची बरीच चर्चा झाली होती. वयाची साठी पार केलेल्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या फिटनेसमध्ये अनिल कपूर यांचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. नुकतंच अनिल कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नवी फिटनेस पोस्ट शेअर केली आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वर्कआऊट करतानाचा एक फोटो देखील शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “लॉकडाउन हे अनिवार्य आहे, पण यात तुम्ही काय करता हे पर्यायी आहे…”. या फोटोमध्ये अनिल कपूर बायसेप्स दाखवताना दिसून येत आहेत.

अनिल कपूर यांनी मागील काही वर्षात आपल्या फिटनेसवर बरेच काम केले आहे. ते त्यांच्या सोशल मीडियावर वेळोवेळी फिटनेस पोस्ट शेअर करतच असतात. अनिल कपूर यांचा दिवस वर्कआऊटनेच सुरू होतो. नुकतंच शेअर केलेल्या वर्कआऊट पोस्टवर त्यांच्या फॅन्ससह बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील इम्प्रेस झालेत. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांच्या फिटनेसचं कौतूक केलंय. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील कमेंट करत ‘तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात’, असं म्हटलंय. टिव्ही स्टार करण ठक्कर हा सुद्धा अनिल कपूरची फिटनेस पाहून अवाक झाला आणि लिहिलं, “या फिटनेससाठीचं रूटीन सांगा”. ‘जुग जुग जियो’ फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी देखील अनिल कपूर यांच्या फिटनेसचं कौतूक केलं.

Anil Kapoor Fitness Comments
(Photo: Instagram@anilskapoor)

याआधीही अनिल कपूर यांनी त्यांची फिटनेस जर्नी त्यांच्या फॅन्ससोबत शेअर केली होती. लॉकडाउनमध्ये स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यावेळी अनिल कपूर यांनी सांगितलं होतं. त्यांच्या फिटनेसमागचं रहस्य देखील त्यावेळी त्यांनी फॅन्ससोबत शेअर केलं होतं.