सध्या सगळीकडेच दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. हा चित्रपट नुकताच म्हणजेच ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर यावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “द काश्मीर फाइल्स चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.५ कोटी कमावले आणि तो सुपरहिट ठरला. पण गुजरात दंगलीवर चित्रपट काढला तर कुत्रंही पाहायला जाणार नाही. हे आजच्या भारताचं सत्य आहे आणि मोदीजी २०२४ ची निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान होतील हा याचा पुरावा आहे. त्यांना कोणीही रोखू शकत नाही”, असे केआरके म्हणाला.
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
यानंतर केआरकेने आणखी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये तो म्हणाला, ‘काश्मीर फाइल्सचं यश हा पुरावा आहे की कोणत्याही खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाही. त्यांना उरी, काश्मीर फाइल्स चित्रपट करावे लागतील. टायगर आणि पठाण चित्रपट चालणार नाही.
आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, विनंती करत म्हणाले…
दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटामुळे मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.