बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी टायगर ३ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही झळकरणार आहे. त्यामुळे सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ‘एक था टायगर’ या चित्रपटातील गाण्याच्या शूटींगचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सलमान आणि कतरिनाचा हा व्हिडीओ यशराज फिल्म्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही एक था टायगर या चित्रपटातील Mashallah या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात ते दोघेही रोमँटिक शूट करत आहे. हे गाणे शूट करत असताना कतरिना जेव्हा स्टेप करते तेव्हा सलमान निघून जातो. त्यानंतर दुसऱ्यांदा ती तिच स्टेप करत असताना सलमान गालातल्या गालात हसू लागतो. ते पाहून कतरिनाही हसू लागते आणि त्यानंतर त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते.

हा संपूर्ण व्हिडीओ २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटातील आहे. सलमान आणि कतरिनाच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळाले आहे. तसेच त्यावर अनेकजण कमेंटही करत आहे.

मुंबई विमानतळावर एकमेकांसोबत भांडताना दिसले अरबाज आणि मलायका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टायगर ३ या चित्रपटाचे दिल्लीतील शूटींग हे १४ फेब्रुवारीपासून केले जाणार आहे. याचाच अर्थ व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सलमान आणि कतरिना या चित्रपटाचे शूटींग करणार आहेत. यादरम्यान करोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत.

‘टायगर ३’यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.