‘टायगर ३’चा सहाय्यक दिग्दर्शक सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान!

सलमान आणि निर्वाणचे रशियातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

salman khan, sohail khan, nirvan khan,
सलमान आणि निर्वाणचे रशियातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी रशिलाया गेले आहेत. रशियात ते ‘टायगर ३’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. रशियातील पीटर्सबर्ग शहराच चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

सलमानच्या एका फॅन पेजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सलमान आणि कतरिनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओत सलमान त्याचा पुतण्या आणि सोहेल खानचा मुलगा निर्वाण खानसोबत दिसत आहे. या व्हिडीओत ते एका गाडीत बसत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@salmanic_aryan)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘निर्वाण चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. निर्वाणला खूप लवकर काम सुरु करायचे होते. तो आता २१ वर्षाचा आहे आणि त्याला दिग्दर्शक होण्याची इच्छा आहे. त्यामुळे दिग्दर्शन कसे करतात हे शिकण्यासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या सीनचे चित्रीकरण कसे केले पाहिजे याचे प्रशिक्षण तो घेत आहे. त्यासोबत प्रत्येक डिपार्टमेंटच काम काय असतं त्यांच्यासोबत कसं काम केले पाहिजे हे तो जाणून घेत आहे.’

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

तर, निर्वाणला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय हा सलमानचा होता. त्याने आताच सगळ्या गोष्टी शिकूण घेतल्या पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्याला अडचण येणार नाही असा विचार सलमानने केला. आता निर्वाण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत तिथेच राहणार आहे.

आणखी वाचा : बिग बॉस ओटीटीच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

दरम्यान, रशियात ‘टायगर ३’ चे चित्रीकरण ४५ दिवस होणार आहे. याची सुरुवात एका गाडीचा पाठलाग करण्यापासून होणार आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे. या चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आहेत. यासोबत करोना काळात चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याने सगळ्या निर्बंधांचे पालण करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiger 3 salman khan s nephew and son of sohail khan nirvan khan turns assistant director dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या