बॉलिवूडमध्ये आपल्या डान्स आणि स्टंटच्या टॅलेंटने अभिनेता टागयर श्रॉफने स्वत:ची ओळख निर्माण केलीय. टायगरच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. येत्या काळात वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून टायगर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गणपथ’ तसंच ‘हिरोपंती २’ हे त्याचे आगामी सिनेमे सध्या चर्चेत आहे.

याशिवाय टागगरने नुकताच मुंबईतील उच्चभ्रू भागात नवा फ्लॅट खरेदी केला आहे. या नव्या घरामुळे देखील सध्या टायगर चर्चेत आहे. या पूर्वी टायगर श्रॉफ आणि त्याचं कुटुंबिय एका भाड्याच्या घरात राहत होते. मात्र आता टायगर त्याच्या आई-वडील आणि बहिणीसह या नव्या ८ बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला आहे. टायगरने खार भागात एका भव्य इमारती मध्ये हा आलिशान फ्लॅट खरेदी केलाय. टायगरची आई आयशा श्रॉफ आणि जॉन अब्राहमच्या भावाने मिळून या घराची सजावट केलीय. नुकतीच त्यांच्या गृहप्रवेशाची पूजा पार पडली आहे. तर ब्राह्मणाच्या सांगण्यावरून या घरात खास व्यक्तीने पहिलं पाऊल टाकलं आहे.

हे देखील वाचा: महानायक अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगार ऐकून व्हाल थक्क!, स्वत:चा देखील आहे ‘हा’ बिझनेस

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने ईटीटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नव्या घराबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. नव्या घराच्या गृहप्रवेशाची पूजा झाली असून या पूजेसाठी केवळ कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याचं ती म्हणाली. यावेळी भटजींच्या सांगण्यावरूनच कृष्णाने या घरात पहिलं पाऊल टाकलं असल्याचं ती म्हणाली. तसचं आता नव्या घरात त्यांचे वडील म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ आता अधिक वेळ घालवत असल्याचं ती म्हणाली.

हे देखील वाचा: टॉपलेस फोटोवरून ट्रोल झाली होती कियारा आडवाणी, नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर म्हणाली…

एकेकाळी जॅकी श्रॉफ यांच्यावर घरातील फर्निचर विकरण्याची देखील वेळ आली होती. त्यावेळी टायगर ११ वर्षांचा होता. एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. तर आता टायगर श्रॉफने आपल्या संपूर्ण कुटुंबियांसाठी ८ बेडरुम असलेला नवा फ्लॅट खरेदी केला आहे.