ट्रेनिंगदरम्यान प्रशिक्षकाला बसली टायगर श्रॉफची किक, व्हिडीओ व्हायरल

त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये खासकरुन अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून टायगर श्रॉफला ओळखले जाते. टायगर हा नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतो. तो कायमच सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊट किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. नुकतंच टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या ट्रेनरची माफी मागितली आहे.

टायगरने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी काही स्टंटचा सराव करताना दिसत आहे. यात तो त्याच्या प्रशिक्षकाकडे धावत येताना दिसत आहे. त्याचा प्रशिक्षक हा सेफ गार्ड लावून समोर उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर या टायगर हा फ्लाईंग किकचा सराव करत असतो, त्यावेळीच त्याची एक किक ही त्याच्या ट्रेनरला जोरात लागते. या सरावादरम्यानचा संपूर्ण व्हिडीओ हा टायगरने इन्स्टावर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने याला कॅप्शन देताना प्रशिक्षकाची माफी मागितली आहे. “जेव्हा अॅक्शन रिहर्सल चुकते…नदीम अख्तर मला माफ करा,” असे त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अभिनेत्री दिशा पटानी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी टायगर ‘बागी ३’ या चित्रपटात दिसला होता. यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्याचे देशभक्तीवरील एक गाणं प्रदर्शित झाले होते. हे गाणं ‘वंदे मातरम्’ गाण्याचं एक नवीन व्हर्जन असून टायगरने स्वत: गायलं आहे. काही दिवसांपूर्वी टायगरचा आगामी चित्रपट ‘गणपत’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनॉन दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiger shroff flying kick position hitting on the chest of action trainer video viral nrp