राम गोपाल वर्मा टायगर श्रॉफला म्हणाले ‘बिकिनी बेब’; दिलं हे उत्तर

अरबाज खानच्या ‘पिंच २’ मध्ये पोहोचला टायगर श्रॉफ…व्हर्जिनिटीपासून ते लुकवरून ट्रोलपर्यंत सगळ्या मुद्द्यावर दिल्या प्रतिक्रिया.

tiger-shroff-ram-gopal-varma

‘अ‍ॅक्शन हिरो” म्हणून ओळखला जाणारा टायगर श्रॉफ याला नेहमीच मुलींसारखा दिसतो म्हणून अनेकदा चिडवलं जातं. फिल्ममेकर राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट शेअर करत अभिनेता टायगर श्रॉफला ‘बिकिनी बेब’ म्हटलं होतं. त्यावरून त्याला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं. यावर अभिनेता टायगर श्रॉफने आता सडेतोड उत्तर देऊन सर्व ट्रोलर्सना गप्प केलंय.

अभिनेता टायगर श्रॉफ नुकतंच अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शोमध्ये आला होता. यात तो आपल्या व्हर्जिनिटीपासून ते राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्रोलपर्यंत सगळ्या मुद्द्यांवर मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसून आला. या शोमध्ये अरबाजने टायगरला राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटबद्दल सांगितलं. “igitigershroff तू मार्शल आर्टमध्ये तरजेब आहेस, पण जर ब्रुस लीने तुझ्यासारखी ‘बिकिनी बेब’ची पोज दिली असती तर तो ब्रुस ली बनला नसता. कृपया विचार कर.” यावर बोलताना अभिनेता टायगर श्रॉफने कोणताही वाद न घातला पण तितकंच सडेतोड उत्तर दिलंय.

 

टायगरने दिलं हे उत्तर

राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटवर बोलताना अभिनेता टायगर श्रॉफ म्हणाला, “भाईजान (सलमान खान) वगळता कोणीही भिडूशी स्पर्धा करू शकत नाही. ब्रूस लीशी स्पर्धा करणं हे काही सोपं नाही, म्हणून सर, मला वाटतं की तुम्ही अगदी बरोबर आहात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

चेहऱ्याच्या लुकवर वाईट कमेंट्स देत होते

या शोमध्ये बोलताना अभिनेता टायगर श्रॉफ म्हणाला, “जेव्हा माझा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझी तुलना पिता जॉकी श्रॉफ यांच्यासोबत करू लागले. माझ्या पर्सनॅलिटीवरून सुद्दा खूप वाईट कमेंट्स केल्या जात होत्या. हा हिरो आहे की हिरोइन? हा त्याच्या वडील जॉकी श्रॉफसारखा तर नाही दिसत.. हे सारं माझ्या शक्तीसोबत खेळण्यासाठी सारासार विचार करून केलेलं षडयंत्र आहे. एका ट्रोलने तर असंही म्हटलं होतं की, तुमच्याकडे सगळं काही आहे पण फक्त दाढी नाही…” सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर बोलताना अभिनेता टायगर श्रॉफ म्हणाला, “जर तुम्ही ट्रोल होताय, याचा अर्थ तुमचा प्रभाव वाढत चाललाय. मी आता जे काही आहे ते फक्त प्रेक्षकांमुळे आहे. जोपर्यंत मी प्रेक्षकांच्या मनात नंबर एकवर आहे, तोपर्यंत मला या सगळ्यांचा काही फरक पडत नाही.”

आणखी वाचा: Anushka Sen Birthday: अनुष्काने उदयपुरमध्ये असा साजरा केला वाढदिवस; इतक्या किंमतीचं मिळालं स्पेशल गिफ्ट

अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शोमध्ये आतापर्यंत दोन पाहुणे कलाकार आले आहेत. सलमान खान हा त्याच्या ‘पिंच २’ शोमधला सगळ्यात पहिला पाहुणा कलाकार ठरला. त्यानंतर अभिनेता आयुष्यमान खुराना या शोमध्ये सहभागी झाला. नुकतंच या शोमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ अनन्या पांडे आणि फराह खान हे दिसून आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiger shroff reacts to being called bikini babe by ram gopal verma on the show pinch prp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या