‘अँटमगिरी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता ‘तिरसाट’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. हा चित्रपट २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. रिफ्रेशिंग अशा या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा : Oscar 2022 वादानंतर विल स्मिथ मुंबईत…, ‘या’ अध्यात्मिक गुरूंची घेणार भेट?

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केल आहे. नकार सकारात्मकतेनं घेतला की आयुष्याला अर्थ येतो या आशयाचवर हा चित्रपट आहे.