२००१ मध्ये रिलीज झालेल्या अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ हा चित्रपट सुरपहिट ठरला होता. या चित्रपटातल्या कथेपेक्षा जास्त चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. विशेष करून या चित्रपटाच्या ‘कोई फरियाद’ या गाण्याने… हे गाणं प्रत्येकाच्या मनालं भावलं. हे गाणं त्यावेळी प्रत्येकाच्याच प्लेलिस्टमध्ये सामिल होतं. या सुपरहिट गाण्याला लोक आजही एकांतात ऐकत असतात.
‘तुम बिन’ चित्रपटातील ‘कोई फरियाद’ या गाण्याने गायक जगजीत सिंह यांच्या करिअरला उंचावर नेलं होतं. पण हे गाणं जितकं सुपरहिट ठरलं त्याहुनही कितीतरी पटीने जास्त गाणं बनवण्यासाठीची मेहनत होती. गाणं सुपरहिट होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. दिग्दर्शक अनुभन सिन्हा यांनी नुकतंच गाण्याच्या पडद्यामागची गोष्ट सांगितली. या गाण्याचे लेखक फैज अनवर यांना गाण्याच्या ओळींसाठी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती.
‘इंडियन एक्प्रेसस’सोबत बोलताना दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी हा खुलासा केलाय. या गाण्याचे लेख फैज अनवर हे एक शायर होते आणि त्याचवेळी त्यांनी गाणं लिहण्यास सुरवात केली होती. फैज अनवर यांनी आपल्या ‘तुम बिन’ चित्रपटासाठी एक गाणं लिहावं अशी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची इच्छा होती. या गाण्यात त्यांनी लिहिलेला एक शेर सुद्धा असावा असं त्यांना वाटत होतं. यासाठी जेव्हा लेखक फैज अनवर यांनी गाणं लिहिण्यासाठी तयारी दाखवली त्यावेळी गाण्यासाठी ‘एक लम्हे में सिमट आया सदियों का सफर… जिंदगी तेज बहुत बहुत तेज चली हो जैसी’ हा शेर तयार केला होता. गाण्यातल्या या शेरसाठी एक नाही, दोन नाही तर तब्बल ८१ वेळा रिजेक्शन मिळालं होतं. पण अखेर ८२ व्या वेळी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या शेरसाठी परवानगी दिली.
या गाण्याचा यशामागची कहाणी इथवरंच संपत नाही. तर म्युझिक कंपोजर निखिल सामथ हे या गाण्याला एक मॉर्डन टच देण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गायक जगजीत सिंह काहीसे नाराज झाले होते. या गाण्यातलं मॉर्डन संगीत ऐकून ते नाराज झाले होते आणि ते डबिंग स्टुडिओमधून बाहेर आले. गाण्याला केवळ गायक जगजीत सिंह यांचा आवाजंच योग्य न्याय देऊ शकतो, असं दिगदर्शक अनुभव सिन्हा यांना वाटत होतं. यासाठी त्यांनी गायक जगजीत सिंह यांना गाण्यासाठी खूप विनंती केली. या सगळ्या घडमोडींमधून जाऊन अखेर ९ मिनीटांची आणि मनाला भावणारी अशी गजल लोकांसमोर सादर झाली. ही गजल पुढे जाऊन सुपरहिट ठरली. या गाण्याच्या यशानंतर २०१६ मध्ये ‘तुम बिना’ चित्रपटाचा सिक्वल देखील आला. पण या चित्रपटाची कथा आणि गाणं दोन्ही प्रेक्षकांना काही आवडलं नाही.