टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी सध्या तिचा सह-कलाकार शिझान खान पोलीस कोठडीत आहे. शिझानने मुलीला मारलं, तिच्याशी ब्रेकअप केलं, तिचा छळ केला असे गंभीर आरोप तिची आई वनिता शर्मा यांनी केले होते. त्यानंतर शिझान खानच्या कुटुंबीयांनी सोमवारी याबदद्ल पत्रकार परिषद घेत त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी तुनिषाच्या आईवरच मुलीची इच्छा नसताना पैशांसाठी तिला काम करायला लावल्याचा आरोप केला. तसेच तिची आई संजीव कौशल नावाच्या एका व्यक्तीबरोबर चंदीगढमध्ये राहायची आणि या दोघांचं अफेअर असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती. या संपूर्ण प्रकरणावर संजीव कौशल यांनी मौन सोडलंय.

‘ईटाईम्स’शी खास बातचीत करताना संजीव कौशल यांनी आपली बाजू मांडली. तुनिषाच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या आरोपांवर ते म्हणाले, “ती अवघ्या २० वर्षांची होती आणि तिने लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिचे पैसे कोणीतरी सांभाळणं गरजेचं होतं. आम्ही तिला स्वतःचे पैसे खर्च करण्यापासून कधीच रोखलं नाही. तिला वाटेल तेव्हा ते पैसे खर्च करण्यास आणि हवं ते घेऊ शकत होती. आम्ही तिला काम करण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही. तिला अभिनय आवडायचा, म्हणून ती करायची. तिने आतापर्यंत कायम चांगले प्रोजेक्ट्स केले होते.”

तुनिषा शर्मा प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा…”

तुनिषाच्या संपत्तीबद्दल खुलासा

संजीव कौशल यांनी तुनिषाच्या मालमत्तेबाबतही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले “लोक असाही दावा करत आहेत की तुनिषा १६ कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली आहे, पण त्यात तथ्य नाही. अगदी तिची कार आणि लॅपटॉप देखील हप्त्यांवर विकत घेतले होते,”

“पवन शर्मा तुनिषाचा मामा नव्हे तर…” शिझान खानच्या बहिणीचा मोठा खुलासा

तुनिषाच्या कुटुंबीयांशी संजय कौशलचं नातं काय?

दरम्यान, तुनिषाच्या आईसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं, यावरही संजीव कौशलने यांनी प्रतिक्रिया दिली. “तुनिषा माझी मुलगी नव्हती याची मला नेहमीच खंत राहील. अशी गोड आणि हुशार मुलगी प्रत्येकाला हवी असते. मी तिच्यावर माझ्या मुलीइतकंच प्रेम केलं. माझ्या मुलीचं नाव रितिका आणि ती २२ वर्षांची आहे. आम्ही गेल्या १०-१२ वर्षांपासून या कुटुंबाला ओळखत होतो. रितिका आणि तुनिषाचा वाढदिवसही आम्ही एकत्र साजरा करायचो. आम्ही त्यांचे १६ वाढदिवस एकत्र साजरे केले आहेत. जे तुनिषासाठी घ्यायचो, तेच रितीकासाठी घ्यायचो. दोघींना कायम समान वागणूक दिली. काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त असतात, अशी नाती प्रत्येकाची असतात, तुमचीही असतील,” असं ते म्हणाले.

पालकांची भांडणं, सातव्या वर्षी घरमालकाकडून लैंगिक अत्याचार अन्… तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानने आयुष्याबद्दल केलेले धक्कादायक खुलासे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजीव कौशल तुनिषाचे सावत्र वडील?

संजीव कौशल पुढे म्हणाले, “लोक त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणतात. आम्ही लवकरच मीडियाशी बोलून सावत्र बाप आणि सावत्र मुलीबद्दल होणाऱ्या आरोपांचा खुलासा करू. २४ डिसेंबरला तुनिषा आणि शिझान यांच्यात १५ मिनिटांचे संभाषण काय होतं, ते हे लोक का सांगत नाहीत,” असा सवाल त्यांनी केला. तसेच आपण तुनिषाची आई वनिता शर्माला चंदीगडला आणलं आहे. तसेच तिचा पाळीव कुत्राही सोबत आणला आहे. सध्या आम्ही तिच्या आईची काळजी घेतोय, असं ते म्हणाले.