अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट ती सतत शेअर करत असते. मात्र शुक्रवारी ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक भन्नाट सेल्फी शेअर केलाय. हा फोटो पाहून ट्विंकलचा हा अवतार कुणी केला असा प्रश्न अनेकांना पडला. दुरसं तिसरं कुणी नाही तर ट्विंकल खन्नाच्या लेकीनेच तिचा हा मेकअप केला आहे.
ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे रंग लागल्याचं दिसतंय. काळ्या रंगाने ट्विंकलच्या दोन्ही भुवया जोडल्या गेल्य़ा आहेत. ट्विंकलचा हा फोटो पाहून अनेकांना आधी आश्चर्य वाटलं. मात्र कॅप्शनमधून ट्विंकलने तिचा हा मेकअप मुलगी निताराने केल्याचं म्हंटलं आहे. “दुसरा दिवस आणि दुसरा मेकओव्हर. मला शिक्षा भोगावी लागतेय. आणि या चिमुकलीचं मेकअप आर्टिस्ट म्हणून काही भविष्य नाही. फनी मेकओव्हर” असं ट्विंकल कॅप्शनमध्ये म्हणालीय.
ट्विंकलच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींसोबतच अनेक चाहत्यांनी धमाल कमेंट दिल्या आहेत. अनेकांनी ट्विंकलाला तिच्या मुलीने फ्रिडा कालो या प्रसिद्ध अनेरिकन चित्रकाराचा लूक तिला दिल्याचं म्हंटलं आहे. तर एक युजर अक्षय कुमारला उद्देश म्हणलाला, ” मला वाटलं त्यानं केलं. तो जोकरचा लूक आणखी कलरफूल करू शकतो.”
View this post on Instagram
गेल्यावर्षी मे महिन्यात ट्विंकल खन्नाने असाच एक फोटो शेअर कला होता. “चिमुकलीने माझा चांगला मेकओव्हक केला आहे.” असं ती पोस्टमध्ये म्हणाली होती. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार अनेकदा आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात.