दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणने अनेक इंटिमेट सीन दिले आहेत. मात्र आता हा चित्रपट एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. कारण एका ट्विटर युजर्सने या चित्रपटातील एक चूक शोधून काढली आहे. त्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा ‘गहराइयां’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच क्लो-अमांडा बेली या एका ट्विटर युजरने या चित्रपटातील एका दृश्याचे दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोत अनन्या पांडे दिसत आहे. या फोटोत अनन्या पांडेच्या हातात एक ग्लास दिसत आहे. यातील पहिल्या फोटोत हा ग्लास वेगळ्या आकाराचा आहे. तर दुसऱ्या फोटोत या ग्लासचा आकार वेगळा दिसत आहे. यावरुनच तुम्हाला यातील मोठी चूक पाहायला मिळत आहे. त्याने काढलेली ही चूक पाहून सर्वजण थक्क झाले आहे.

मात्र एका ट्विटर युजरने हे दोन्हीही दृश्य वेगवेगळी असल्याचे सांगितले आहेत. पण त्यानंतर बेली यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनन्या ही एका रुमच्या बाल्कनीमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. त्यात तिच्या हातातील ग्लास हा वेगळ्या आकाराचा आहे. तर त्यानंतर याच दृश्याच्या शेवटी अनन्या पुन्हा पाणी पिताना दिसत आहे. मात्र त्यावेळी तिच्या हातात एक वेगळा आकार असलेला ग्लास असल्याचे दिसत आहे.

या ट्विटर युजरने पकडलेली ही चूक अतिशय बारीक स्वरुपाची आहे. मात्र ती पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे.

“नवीन चेहऱ्यांसह चित्रपट बनवणे आव्हानात्मक…”, सुशांत सिंहच्या आठवणीत ‘काइ पो चे’चा दिग्दर्शक भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्राने केले आहे. तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांथ व्यतिरिक्त अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. आता हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशात ही अॅमेझॉन प्राइमच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.