Video : दीपिकाने इरफान खानला पाहिले अन्…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे अलिकडेच कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, त्याचे चित्रपट आणि त्याच्या विषयीच्या आठवणी चाहते व कलाकारांमध्ये जिवंत आहेत. नुकताच बॉलिवूडची मस्तीन अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि इरफान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे अलिकडेच कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, त्याचे चित्रपट आणि त्याच्या विषयीच्या आठवणी चाहते व कलाकारांमध्ये जिवंत आहेत. नुकताच बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि इरफान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भंयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका आणि इरफानचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हॉलिवूड चित्रपट ‘एक्सएक्सएक्सः रिटर्न ऑफ जेंडर केज’ (XXX: Return of Xander Cage)च्या प्रीमियरच्या वेळीचा आहे. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट होता. प्रीमियरसाठी इरफान त्याच्या कुटुंबीयांसोबत तेथे पोहोचला होता. त्यावेळी दीपिका मीडियाशी संवाद साधत होती. पण इरफानला पाहून ती आनंदी होते आणि जाऊन त्याला भेटते. दरम्यान इरफान दीपिकाला त्याचा मुलगा बाबिलची भेट करुन देतो.

दीपिका आणि इरफानने सुपरहिट चित्रपट ‘पीकू’मध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाल्याचे समोर आले होते. हा चित्रपट ८ मे २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज पाच वर्ष झाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unseen video of irrfan khan when deepika padukone left interview to hug him avb

ताज्या बातम्या