Upcoming OTT And Theatre Releases : या आठवड्यात थिएटर आणि ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशा अनेक उत्तम गोष्टी प्रदर्शित होणार आहेत. ओटीटी आणि थिएटरमध्ये कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित प्रदर्शित होणार आहेत यांच्या यादीवर एक नजर टाकूया.

कांतारा : चॅप्टर १

ऋषभ शेट्टीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कांतारा : चॅप्टर १’ दसऱ्याला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २०२२ मधील सुपरहिट चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तो बॉक्स ऑफिसवर एक व्यावसायिक ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये मुख्य भूमिका साकारण्याव्यतिरिक्त ऋषभ शेट्टी लेखक व दिग्दर्शकदेखील आहे.

सनी संस्कारी की तुलसी कुमारी

वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ व सान्या मल्होत्रा ​​अभिनीत हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘कांतारा : चॅप्टर १’बरोबर प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात मनीष पॉल व अक्षय ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत.

मद्रासी

दक्षिण भारतीय चित्रपट ‘मद्रासी’ ओटीटी रिलीजसाठी सज्ज होत आहे. विद्युत जामवालदेखील यात मुख्य भूमिकेत आहे. हा एक मानसशास्त्रीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो ए. आर. मुरुगदास यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्म – प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

डाकुआं दा मुंडा

हा रोमांचक पंजाबी क्राइम ड्रामा एका अनाथाश्रमात वाढलेल्या गुन्हेगारी कुटुंबातील प्रतिभावान तरुण बॉक्सर कर्माची कहाणी सांगतो. एका दुःखद अपघातामुळे राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव कमावण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होत नाही, ज्यामुळे तो अमली पदार्थाच्या आहारी जातो. हा चित्रपट २ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्म – ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.