चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद अडचणीत आली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर तोकड्या कपड्यांत फिरणं उर्फीला महागात पडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्यामुळे उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली आहे. आज (१४ जानेवारी) उर्फीला अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नग्नता व अश्लीलतेचा प्रचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी उर्फीवर केला होता.

हेही वाचा>> वाद चिघळला! उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात दाखल केली तक्रार

नेमकं प्रकरण काय?

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तोकड्या कपड्यांच मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फीवर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. उर्फीने याबाबत चित्रा वाघ यांना इन्स्टाग्राम स्टोरीमधून उत्तर दिलं होतं. त्यानंतर उर्फीला थोबडवणार असल्याचा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला होता.

हेही वाचा>> अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फीची पोलिसांत तक्रार

उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात शुक्रवारी(१३ जानेवारी) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन सातपुते म्हणाले, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी आयपीसी कलम १५३ (ए) (बी) ५०४, ५०६ आणि ५०६(आय आय) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री व मॉडेल उर्फी जावेदला त्रास दिल्याप्रकरणी सीआर पीसी १४९ आणि १०७ अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे”.