सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. मध्यंतरी भाजपा नेत्या चित्रा वाघ व तिच्यामध्ये बराच वाद रंगला. उर्फीच्या कपड्यांमुळेच या वादाला तोंड फुटलं. तरीही उर्फीने फॅशन करणं काही सोडलं नाही. काही दिवसांपूर्वीच ती पायात नव्हे तर चक्क हातात जीन्स घालून घराबाहेर पडली. यावरुनच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – जगभरात ‘पठाण’ने कमावले ७०० कोटी, शाहरुख खाननेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला, “अजूनही…”

उर्फीने जीन्सपासून टॉप तयार केला. तिच्या या ड्रेसिंग स्टाइलची बरीच चर्चाही रंगली. उर्फीला तिच्या या फॅशन सेन्सवरुन ट्रोलही करण्यात आलं. आता तिच्या या लूकवरुनच एका चाहत्याने मजेशीर व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान व करिश्मा कपूरचा ‘दिल तो पागल है’ चित्रपटामधील सीन पाहायला मिळत आहे. या चित्रपटामधील एका सीनमध्ये करिश्मा शाहरुखसह जीन्स खरेदी करायला जाते. शाहरुख ट्रायल रुममध्ये जीन्स घालून बघतो. पण ट्रायल रुममधून बाहेर येताना जीन्स परिधान करणंच विसरतो. यावर करिश्मा विचारते, “तुझी पँट कुठे आहे?”

आणखी वाचा – Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटामधील शाहरुखची पँट आता उर्फीकडे मिळाली असल्याचं मजेशीर अंदाजामध्ये नेटकरी म्हणत आहेत. तर उर्फीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “हा व्हिडीओ अगदी मजेशीर आहे. म्हणून मी रिपोस्ट केला.” उर्फीलाही या व्हिडीओ पाहून अश्रू अनावर झाले. तर इतर सेलिब्रिटी मंडळींनीही यावर कमेंट केल्या आहेत.