आपल्या अतरंगी कपड्यांमुळे कायम वादात अडकणारी मॉडेल उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तिने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ याला कारणीभूत ठरला आहे. तिने ‘भूलभूलैया’ सिनेमातील राजपाल यादवच्या पात्राप्रमाणे वेशभुषा केली होती. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओनंतर तिला मेलवर धमक्या येत आहेत.

“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा

उर्फीने हॅलोविन पार्टीसाठी हा लूक केला होता. उर्फीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘भूल भुलैया’मधील राजपाल यादवने साकारलेल्या ‘छोटा पंडित’ या पात्रासारखी दिसत होती. इतकंच नाही तर तिने डोक्यावर अगरबत्तीही लावली होती. कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिलं, “छोटा पंडित हे भूल भुलैया मधील एक पात्र आहे हे सर्वांना माहित असेल, अशी मला आशा आहे. मी हॅलोविन पार्टीसाठी खूप चांगली तयार झाले होते, पण मी जाऊ शकले नाही, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करायचा विचार केला.”

उर्फीला धमकीचे ईमेल येत असून तिने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) तिने याबद्दल पोस्ट लिहिली आहे. तिने सांगितलं की दोन वेगवेगळ्या लोकांनी तिला मेलद्वारे धमकी दिली, एकाचे नाव निखिल गोस्वामी आहे. उर्फीने तिचा व्हिडीओ डिलीट केला नाही तर तो तिला मारेल, असं त्याने लिहिलं आहे. तर, दुसरा ईमेल रूपेश कुमारचा आला आहे. “उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे. मी तुला भर चौकात गोळ्या घालेन,” असं त्याने म्हटलं आहे. “या देशातील लोकांमुळे मी स्तब्ध आहे आणि मला धक्का बसला आहे. मला एका चित्रपटातील एक पात्र रिक्रिएट केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, पण त्या पात्रावर मात्र कोणालाही आक्षेप नव्हता,” असं उर्फीने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उर्फी तिच्या कपड्यांमुळे वादात अडकल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा कपड्यामुळे तिला धमक्या मिळाल्या आहेत. बऱ्याचदा युजर्स तिला साधे कपडे घालण्याचा सल्ला देत असतात.