मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर हा वाद चांगलाच वाढला असून यामध्ये बऱ्याच लोकांनी उडी घेतली आहे.

चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी अमृता फडवणीस, कंगना, केतकी चितळे यांचे बोल्ड फोटोज शेअर करत त्यांच्या वेशभूषेवर टीका टिप्पणी केली आहे. यादरम्यान उर्फीनेसुद्धा चित्रा वाघ यांना उद्देशून ट्वीट केलं आहे. दिल्लीतील एका अपघाताचा उल्लेख करत उर्फीने चित्रा वाघ आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी केली आहे.

आणखी वाचा : “मुसलमान आपल्या देशाला हिंदुस्थान का म्हणतात?” शरद पोंक्षे यांनी सांगितलं यामागील कारण

इतकंच नाही तर यापुढेही मी मला जे आवडतं ते परिधान करणार अशा अर्थाचं वक्तव्य करत उर्फीने चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. आता उर्फीची नवीन पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. उर्फीने पुन्हा एक बोल्ड फोटो शेअर करत तिच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोमध्ये उर्फीने फक्त जीन्स परिधान केलेली आहे, शरीराच्या वरच्या भागावर कोणतेही कपडे परिधान न करता एक मोठं वृत्तपत्र उर्फीने तिच्या पुढ्यात धरलं आहे. या वृत्तपत्रामुळे तिच्या चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत पूर्ण शरीर झाकलेलं आहे. या वृत्तपत्रावर ‘Be Yourself’ असं ठळक अक्षरात लिहिलेलं आहे. या फोटोमधून उर्फी जणू लोकांना तुम्ही आहात तसे स्वतःला स्वीकारा असा संदेश देत आहे. या बोल्ड फोटोमुळे हा वाद आणखी चिघळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलिस आता या प्रकरणासंदर्भात ठोस पावलं उचलणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.