scorecardresearch

Video: चित्रा वाघ “थोबडवून काढेन” म्हणाल्यानंतर उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ, म्हणाली…

चित्रा वाघ यांच्या विधानानंतर उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला बिकिनीमधील व्हिडीओ

Video: चित्रा वाघ “थोबडवून काढेन” म्हणाल्यानंतर उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ, म्हणाली…
उर्फी जावेदने शेअर केला बोल्ड व्हिडीओ. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आपल्या चित्र-विचित्र कपड्यांमुळे लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना इन्स्टाग्राम स्टोरीमधून उत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी “उर्फी माझ्या समोर आली तर आधी मी तिला थोबडवेन”, असं उर्फीबाबत विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उर्फीने पुन्हा तिच्या सोशल मीडियावरुन अर्धवट कपड्यांमधील व्हिडीओ शेअर केला आहे. चित्र-विचित्र बिकिनी परिधान करुन उर्फीने पुन्हा फोटोशूट केलं आहे.

हेही वाचा>>“मी तयार नव्हते…”, लग्नानंतर महिन्याभरातच पाठकबाईंचा खुलासा

उर्फीने या व्हिडीओद्वारे पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओला तिने “ख्वाब देखे” हे गाणं दिलं आहे. “सजना अनाडी”, असं कॅप्शन देत उर्फीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे उर्फी सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.

हेही पाहा >>“आमचं नातं मैत्रीपेक्षा…”, अमृता देशमुखबरोबरच्या नात्याबाबत प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य

हेही वाचा>>“तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी

सोशल मीडिया सेन्शन असलेल्या उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे. सुषमा अंधारेंनी त्यांच्या फेसबुकवरुन केतकी चितळे, कंगना रणौत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचे काही फोटो शेअर केले आहेत. यांच्या कपड्यावर आक्षेप घेणार का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या