स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मात्र आता लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट उलगडण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोनंतर अनेक नेटकरी अंदाज वर्तवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणाऱ्या आईची भूमिका साकारत आहे. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात उर्मिला कोठारेला गंभीर आजार झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी तिची मुलगी स्वरा ही पैशाची धडपड करताना दिसत आहे. मात्र या आजारपणात तिचा मृत्यू होणार आहे. त्यानंतर ती या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे बोललं जात आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेद्वारे उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनी टेलिव्हीजन विश्वात पुनरागमन केले आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या मुलीची कथा यात पाहायला मिळत आहे. उर्मिला ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवरील धमाल किस्से, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तिने यात वैदेही हे पात्र साकारलं होतं. अनेक वर्षांनी मालिकेत काम करायला फार मजा येत असल्याची प्रतिक्रिया अनेकदा तिने दिली होती.

यंदा ‘कोण होणार करोडपती’ चा कार्यक्रम असणार फारच खास, अभिनेत्री काजोलही होणार आईसह सहभागी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र केवळ दोन महिन्यात उर्मिलाने या मालिकेला रामराम का ठोकला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच उर्मिला साकारत असलेल्या वैदेही या पात्राचा मृत्यू झाल्यानंतर आता या मालिकेत येत्या कोणतं वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.