मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. बॉलिवूडचा ऐतिहासिक चित्रपटांकडे बघायचा दृष्टिकोन तान्हाजीमुळे बदलला. आता ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. साऊथ सुपरस्टार प्रभास हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाविषयी एक खास अपडेट समोर आली आहे.

आणखी वाचा : Raju Srivastava : जेव्हा राजू श्रीवास्तव यांच्या घरी झाली होती चोरी…

येत्या ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ३ ऑक्टोबर या तारखेला टिझर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल अधिकृत खुलासा अद्याप केला गेलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘आदिपुरुष’चा टिझर हा अत्यंत भव्य पद्धतीने अयोध्या येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजक एका भाव्य कार्यक्रमाची तयारी करत आहेत. इतकंच नव्हे, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. त्यांच्या हस्ते या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : फक्त क्रिती नव्हे तर ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडलं गेलंय प्रभासचं नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर बेतलेला आहे असं या चित्रपटाच्या मेकर्सचं म्हणणं आहे. पूर्णपणे रामायण यात नसलं तरी त्यासदृश्य कथा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. या चित्रपटात क्रिती सनॉन ही जानकी भूमिकेतदिसणार आहे तर प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सैफ अली खान हा पुन्हा लंकेश या आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.