Keerthy Suresh : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ३२ वर्षीय कीर्ती तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉयफ्रेंडशी लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी कीर्ती आता वैयक्तिक आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कीर्ती सुरेश डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तिचा बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलशी लग्न करणार आहे. अँटनी हा बिझनेसमन असून तो दुबईत राहतो. कीर्ती व अँटनी दोघे गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. डिसेंबर महिन्यात कीर्ती आणि अँटनी यांचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘एक मोटा हाथी…’, म्हणत निक्कीने उडवली खिल्ली! वजन काट्यावर उभं राहून आर्याने स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज; नेमकं काय घडलं?

कीर्ती व अँटनी यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच लोक उपस्थित राहतील. त्यांचे लग्न ११ व १२ डिसेंबरला गोव्यात होईल. कीर्ती लवकरच तिच्या लग्नाची बातमी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. अँटनी व कीर्ती शाळेत एकत्र शिकायचे, दोघांचं लहानपणीचं प्रेम आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – दिलीप जोशी-असित मोदी यांच्या भांडणाच्या वृत्तावर ‘आत्माराम भिडे’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आम्ही सर्वजण…”

Keerthy Suresh wedding
अभिनेत्री कीर्ती सुरेश (फोटो – इन्स्टाग्राम)

कीर्ती सुरेश ही चित्रपट निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. किर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर ‘गीतांजली’ या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. किर्तीला दिग्गज अभिनेत्री सावित्रीच्या जीवनावर आधारित ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा – ‘या’ मराठी चित्रपटाने रचला इतिहास, प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी रुपये; कधी होणार रिलीज? वाचा…

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किर्तीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती वरुण धवनबरोबर ‘बेबी जॉन’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट थलपती विजयच्या ‘थेरी’चा रिमेक आहे. ‘बेबी जॉन’ २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.